पिसाळलेल्या डुक्करच्या हल्ल्यात 9 वर्षीय बालक गंभीर जखमी : भडगाव येथील घटना
"पिसाळलेल्या डुक्करच्या हल्ल्यात"
"9 वर्षीय बालक गंभीर जखमी"
जळगाव जिल्यातील भडगाव येथीलतील घटना
भडगाव प्रतिनिधी
भडगाव शहरातील यशवंत नगर भागात राहत असलेल्या 7 वर्षीय नितीन रामचंद्र माळी बालकावर काल संद्द्याकाली पिसाळलेल्या डुक्करने हल्ला चढवल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला आहे, त्याच्या ओठ , गाल , कान, दोन्ही हाथ, पाय, कंबरेवर जखमा झाल्या असून त्यास लोकांनी डुक्करास हुडकावल्याने तो बचावला ,
या पूर्वीही याच भागात डुक्करणे एकावर हल्ला केला होता , लोकांनी याबाबत पालिकेत तक्रार केली होती , मात्र दुर्लक्ष झाल्याने डुक्करांचा बंदोबस्त झाला नाही , त्यामुळे दुसरी घटना गंभीर घडल्याने लोक संतप्त झाले आहे . याबाबत पालिकेकला व जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे .
नितीन हा घरा यशवंत नगर भागातील जवळ असलेल्या मंदिरावर खेळत होता , तेथून घरी येतांना यावर डुक्करने पाठीमागून हल्ला करताच तो खाली पडला व त्याने विविध ठिकानी कुर्तंडायला सुरुवात केली , खाली पडल्याने उठून पले पर्यंत नितीन हा गंभीर जखमी झाला , लोकांनी धावून येऊन त्यास वाचविले , तो रक्त भंभाळ झाला होता, त्यास तत्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालयातुन धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले, नितीन हा गरीब कुटुंबातील असल्याने त्यास उपचार करनेही कठीण आहे , याभागात नेहमी अशा घटना होत असून पालिका सांगूनही लक्ष देत नाही म्हणून आता नुकसान भरपाई द्यावी व डुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुलाच्या नातलगांसह नागरिकांनी निवेदना द्वारे केली आहे , निवेदनाच्या प्रति पालिका व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे . निवेदनावर असंख्य सह्या आहेत ,
* यापूर्वी पालिकेने डुक्कर मालकांना दोन दा शहरातून डुक्कर कडून नेण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र ठोस कारवाई न झाक्याने मोक्काट पशूंच्या संख्येत वाढ झाली असून आता एका मागे एक हल्ले होत असल्याने नागरी जनजीवन धोक्यात आले आहे .
0 टिप्पण्या