Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

'भडगाव ला शेकडो अतिक्रमित दुकानंनवर कारवाही' सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यवाही 'नागरिकांचा सनदशील लढा'


'भडगाव ला शेकडो अतिक्रमित दुकानंनवर कारवाही'
सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यवाही 
'नागरिकांचा सनदशील लढा'     

भडगाव 

येथिल पाचोरा रोड चौफुली ते चाळीसगाव चौफुली व बालद रोड , पारोळा रोड भागातील  दोन्ही बाजूचे सर्व अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आज दि 20 रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले ,जेसीबी माशीनेने शेकडो अतिक्रमण धारकांच्या दुकानावर हातोडा चढविला असून अनेक परिवार व दुकानदार बेरोजगार झाले आहेत .

अतिक्रमण निघू नये यासाठी शेकडो दुकानदार मिळून सलग दोन दिवसा पासून जिल्हा व शहरातील राजकीय मंडळींना भेटत आहे, तर काहींनी या अतिक्रमानावर स्टे घेण्याचे तयारी केली आहे . 

यासाठी विजय भोसले , नंदकिशोर पाटील 
सुरेश बोरसे , अय्युब बेग सय्यद सुरेश भंडारी आदी व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे ऑरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती , त्यानुसार इशु नोटीस सार्वजनिक बांधकाम जिल्हाधिकारी , पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला , 

* सकाळी सात वाजता शहरातील 50 पेक्षा जास्त दुकाणे जागेहुन स्थलांतरित होती ,याच वेळी येथील तैनात पोलीस दालने फेर फटका मारला , सकाळी 8 वाजता अर्ड्याहून अधिक दुकाने निघण्याच्या तयारीत होती , सकाळी 9 वाजता जेसीबी मशीन ने हॉटेल राज टी पारोळा रोड वरील ज्यूस चे मोठे सेंटर यावर सरळ झाली , दुकाने जेसीबीने दाबल्याचे पाहून या पट्ट्यातील सर्व राहिलेले दुकाने हातोहात काढण्याची झुंबल उडाली , क्रमाक्रमाने पारोळा चाळीसगाव रास्त्याकडून एकएक दुकान तोडण्यात आले . काही ठिकाणी विना नोटीस अतिक्रमण दुकाने तोडण्यात आली .  दरम्यान अतिक्रमण विरोधात अनेक दुकान दारांनी सकाळी सनद शील मार्गाने न्याय मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांची भेट घेतली मात्र त्यांनी निवेदन स्वीकारले ठोस तोडगा न निघाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एस आर राऊत यांच्याशी दुकानदारांकडून विजय भोसले , प्रदीप पवार यांनी  बस स्थानक समोर चर्चा केली मात्र अभियंता राऊत यांनी कारवाईवर ठाम असल्याचे सांगितली . तर काही दुकानदार न्यायालयीन दाद मागणार आहे . 

* धरसोड वृत्तीची कारवाही चा दुकानदारांनी संताप व्यक्त केला .  दुपारी 3 वाजता शहरातील काही नामांकित व्यक्ती व पुढाऱ्यांची येथील काही दुकान सोडून देण्यात आल्याने त्यापुढच्या दुकानदारांनी संताप केला , त्यावर काही ठिकाणी अतिक्रमण नकाढताच पथकाने काढता पाय घेतल्याने सार्वजनिक बांधकाम च्या या धरसोड वृत्ती विषयी दुकानदारांनी संताप व्यक्त केला . 

* शहरात मोठे उदयोग नसल्याने  बेरोजगार प्रमाण अधिक आहे , पर्यायाने दुकान एकच धंदा काहीनि सुरु केला होता मात्र आता सार्वजनिक बांधकाम च्या अतिक्रमण मोहिमेने त्यांच्या पोटावर हातोडा पडला आहेे. 

यापूर्वी काही महिने आधी सार्वजनिक बांधकाम कडून  १६५ सह अनेक अतिक्रमन धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, तर दि 20 रोजी मागणी नुसार पोलीस बंदोबस्त दिला असून अतिक्रमण काढण्याची एक नोटीस पोलीस निरीक्षक यांनी दोन दिवस आधी दिली होती ,त्यामुळे पोलीस बंदोबस्त मिळाल्याने अतिक्रमण मोहीम निघण्यावर शिक्कामोर्तब असल्याने काहींनी स्टे घेण्यासाठी खंडपीठात धाव घेतली तर दि 19 रोजी संध्याकाळ पासूनच दुकाने व साहित्य घरी नेण्यास सुरुवात केली आहे . राहिलेल्या दुकानांवर दि 20 रोजी जेसीबी माशीनेने  दुकान शेडचे  चेंदामेंदा करण्यात आला 

* असा होता पोलीस बंदोबस्त :- प्रशासन व्यवस्था :-
     पोलीस उप अधीक्षक 1, दुय्यम अधिकारी 3 , पोलीस कर्मचारी 20 ,महिला पोलीस 5 , 2 कॅमेरा मॅन, पोलीस मुख्यालयाच्या आरसीपी प्लाटूून 1 , एस टी जळगाव विभागाचे  एक मोठे वाहन असा बंदोनस्त लावण्यात आला होता, 
सोबत भडगाव पालिकेचा 1 अग्निशामक बंब , भडगाव ग्रामीण रुग्णालयाची अँम्बुलंस, ब्लास्टिंग मशीन, पालिका कर्मचारी , आरोग्यविभाग कर्मचारी, बांधकाम विभाग कर्मचारी हजर  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या