उत्राण,भातखंडे, अंतुर्ली, गिरड रस्त्याची मोठी दुरावस्था
रस्त्यावर पडलेले खड्डेसंजय पाटील:- भातखंडे बुद्रूक ता,भडगाव :-
उत्राण भातखंडे अंतुर्ली गिरड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठी गड्डे पडले असून अपघातांना महाग निमंत्रण नको म्हणून बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे .
उत्राण भातखंडे अंतुर्ली गिरड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या गावांहुन पाचोरा येथे येण्याजाण्यासाठी दररोज या रस्तावरुन शेकडो वाहान धारक प्रवास करीत असतात. वाहान धारकांना वाहान चालविण्या साठी मोठी कसरत करावी लागते. मोठ्या प्रमाणात अवजड वाहानांनी रस्त्यांची पुर्णपणे वाट लागलेली आहे. वेळीच दुरुस्ती नाही. म्हणून यावर्षी अती पावसामुळे व ट्रॅक्टर व अवजड डंपर वाहातुकी मुळे मोठमोठे खंड्डे पडल्याने रस्त्यांचे पुर्ण पणे तीन तेरा वाजले आहे. याकडे सार्वजनीक बांधकाम विभाग व सर्व पदधिकारी यांनी या रस्त्यांकडे लक्ष देण्याची मागणी उत्राण भातखंडे,अंतुर्ली बुद्रूक व येथील वाहानधारक प्रवाशांकडुन होत आहे. नादुरुस्त रस्त्याबाबत नागरिकांची मागणी पाहता येथील लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्य यांनी आवाज उठविण्याची नितांत गरज आहे.

0 टिप्पण्या