सौ. रजनीताई देशमुख महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
भडगाव -
सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक विजय देशपांडे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. या समारंभाला संस्थेचे ज्येष्ठ संचालक विनय जकातदार, गणेश पूर्णपात्री, सौ. रेखा जकातदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा.एस.आर.पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी. आर्टस्, एस.एम.ए. सायन्स व के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वाणिज्य व विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पदक विजेत्या खेळाडूंचे फलकांचे यावेळी अनावरण करण्यात आले. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणारा रोशन संजय पाटील याचे निधन झाले. त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. दिनेश तांदळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती.

0 टिप्पण्या