पालकमंत्री गुलाबराव पाटील ह्यांच्या थेट मुंबईहुन व्हीडिओ कॉन्फरन्स वरून आस्वासनानंतर जुवार्डीकरांचे उपोषण मागे
भडगाव। प्रतिनिधी :-
जुवार्डी ग्रामस्थांचे १५ ऑगस्ट पासून विविध उपोषण सुरू होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही उपोषण कर्त्यांची तब्बेत बिघडली होती. उपोषण कर्त्यांचे वजन कमी झाले होते. त्यामुळे प्रशासन हादरले होते. दरम्यान दुपारी पालकमंत्र्यांनी मुंबईहुन व्हीडिओ कॅन्सफरन्स ने ठोस आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या आश्वासना नंतर हे उपोषण आज मागे घेतले.
दोन दिवसांपूर्वी खा. उन्मेष पाटील ह्यांनी अस्वासन देऊन उपोषण कर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तीन मागण्या जिल्हा परिषद प्रशासनाशी संबधित असताना देखील जिप कडून कोणीही उपोषण कर्त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे उपोषण कर्त्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. भडगाव चे तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, गट विकास अधिकारी आर ओ वाघ, वनविभागाचे उपवनसंरक्षक व वनक्षेत्रपाल उपोषण कर्त्याच्या सतत संपर्कात राहून उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते.
उपोसनाच्या तिसरी दिवशी गट विकास अधिकारी आर ओ वाघ, पोलीस निरीक्षक उतेकर, वनक्षेत्रपाल ह्यानी उपोषण कर्ते व ग्रामस्थांसोबत प्रदीर्घ चर्चा केली. त्यादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला गेल्यामुळे उपसरपंच पी ए पाटील ह्यानी मुबई गाठली. पी ए पाटील ह्यानी आ. किशोर पाटील ह्यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. आमदारांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील ह्यांच्याशी उपोसना संदर्भात मुबंईला मंत्रालयात सविस्तर चर्चा केली. गावात बैठक सुरू असताना गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील ह्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपोषण कर्त्यांशी संवाद साधला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील ह्यांच्या आस्वासनानंतर उपोषण मागे - पालक मंत्री गुलाबराव पाटील व आ. किशोर पाटील ह्यानी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जुवार्डी करांशी चर्चा करून सगळ्या समस्या सोडविणार असल्याचे अस्वासन दिले. तसेच जुवार्डी ग्रामस्थांसोबत लवकरच जळगांव येथे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे अस्वासन गुलाबराव पाटील ह्यानी दिले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील ह्यानी दिलेल्या आस्वासना वर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषद प्रशासनावर विस्वास नसल्यामुळे नजीकच्या काळात प्रश्न सुटले नाहीतर पुढील उपोषण जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात येईल असे उपोषण कर्त्यांनी कळवले आहे. चर्चेअंती खा. उन्मेष पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील ह्यानी दिलेल्या आस्वासनावर विस्वास ठेवून उपोषण मागे घेण्याचे ठरले. पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, गट विकास अधिकारी आर ओ वाघ , वनक्षेत्रपाल ह्यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोसन मागे घेण्यात आले.

0 टिप्पण्या