Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जुवार्डी येथे भरली वृक्षारोपण जत्रा - आईमाय यात्रेनिमित्त बोकड प्रथा विसरून जुवार्डीत सहाशे वृक्षांची लागवड

जुवार्डी येथे भरली वृक्षारोपण जत्रा - आईमाय यात्रेनिमित्त बोकड प्रथा विसरून जुवार्डीत सहाशे वृक्षांची लागवड
भडगाव                                          c

गामीण भागातील सालाबादाप्रमाणे येणाऱ्या ग्रामदेवदैवतांच्या यात्रा-जत्रा ग्रामस्थांसाठी मोठी पर्वणी असते. कुस्त्यांचे रंगणारे फड, पारावरील तमाशाची बारी, खेळण्याची, मिठाई ची दुकाने, लोककला. संसार उपयुक्त वस्तूंची दुकाने ह्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल यात्रा-जत्रा मध्ये होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्यावर काही बंधने आली आहेत. जुवार्डी गावात दरवर्षी आई माय यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त पाऊणे मंडळी पाऊणचारासाठी गावात दाखल होत असतात. काही अनिस्ट प्रथाही यात्रेसोबत जोडलेल्या असतात जसे मांसाहार, यात्रेनिमित्त झिंगाट होणारी मंडळी. हजारो रुपयांची यात्रेनिमित्त उधळण केली जाते.  

प्रा. राजेंद्र ह्यांनी मांडली 'झाडांची यात्रा' ची संकल्पना

जुवार्डी गावाच्या सर्वांगीण विकासात भूमिपुत्र व्हाट्सएप्प ग्रुपचे मोठे योगदान मागील काही वर्षांपासून राहिले आहे. लोकप्रिय अभिनेता सयाजी शिंदे ह्यांच्या 'सह्याद्री देवराई' सामाजिक संस्थे मार्फत राबविल्या जाणाऱ्या 'झाडांचे शतक, शतकांचे झाड' ह्या अभियानापासून प्रेरणा घेऊन जुवार्डी येथील रहिवासी व एस एस व्ही पी एस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक ह्यांनी आई माय  यात्रेनिमित्त 'झाडांची जत्रा' उपक्रम राबवून गावात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड अभियान राबविण्याची संकल्पना भूमिपुत्र ग्रुपच्या सदस्यांकडे मांडली. सगळ्या सदस्यांनी ह्या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवत वृक्ष रोपे घेण्यासाठी लोकवर्गणी व आई माय यात्रेनिमित्त श्रमदानातून झाडांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले. 

 वृक्षलागवड साठी ऑनलाईन पद्धतीने जमवली लोकवर्गणी.

प्रा. राजेंद्र पाटील ह्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भूमिपुत्र गृपच्या सदस्यांनी वृक्षरोपे घेण्यासाठी पन्नास हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लोकसभाग जमा केला. ऑनलाईन पद्धतीने लोकसहभाग जमविण्यासाठी भूमिपुत्र ग्रुपचे सदस्य ठाणे अंमलदार प्रकाश पाटील, ग्राप सदस्य भागवत पाटील, निवृत्त सैनिक दत्तात्रय पाटील व भूषण ह्यांनी मदत केली. लोकवर्गणीतून  ६०० विविध देशी झाडांच्या रोपांची चाळीसगाव, एरंडोल येथील नर्सरीतून खरेदी करण्यात आली. वड, पिंपळ, लिंब, चिंच, शीशम, चांदणी अश्या देशी झाडांना प्राधान्य देण्यात आले. बापू केशव पाटील ह्यांनी वृक्षरोपांच्या वाहतुकीसाठी मदत केली व आधार गतका पाटील ह्यांनीं रोपांची काळजी घेतली. 

आई माय च्या यात्रेच्या दिवशी वृक्षारोपण.

आई मरी यात्रेच्या निमित्त बाहेरगावाला नौकरीला असलेले भूमिपुत्र गावाकडे वृक्षलागवड साठी आले होते.  जुवार्डी ग्रामस्थ, भूमिपुत्र ग्रुपचे सदस्य, प्रा. डॉ . व्ही यु पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच सुनीता ठाकरे, उपसरपंच पी ए पाटील ह्यांनी वृक्षलागवड करण्यासाठी मदत केली. 

लोकप्रिय अभिनेता सयाजी शिंदे ह्यांनी केले कौतुक.

लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे ह्यांनी 'सह्याद्री देवराई' च्या झाडांचे शतक ह्या अभियानात सहभागी होऊन गाव यात्रेनिमित्त वृक्षलागवड केल्याबद्दल जुवार्डी ग्रामस्थांचे व भूमिपुत्र ग्रुपच्या सदस्यांचे  संदेश पाठवून अभिनंदन केले.  सयाजी शिंदे ह्यांनी जुवार्डी करांच्या उपक्रमाचे 'झाडांची जत्रा' असे करून प्रत्येक गावाने जत्रेनिमित्त वृक्षारोपण केले पाहिजे असे आवाहन केले. 

उपसरपंच पी ए पाटील ह्यांनी भूमिपुत्र ग्रुपचे मानले आभार

सरपंच सुनीता ठाकरे व उपसरपंच पी ए  पाटील ह्यांनी गाव यात्रेनिमित्त वृक्षलागवड अभियान राबविल्याबद्दल भूमिपुत्र ग्रुपच्या सदस्यांचे आभार मानले. स्वातंत्र्य  दिनी ग्रामपंचायत मार्फत पुन्हा वृक्षलागवड करणार असल्याचे तसेच बिहार पॅटर्न प्रमाणे ही मोठ्या प्रमाणात वृक्षांचे रोपण व संवर्धन करून गाव हिरवेगार करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या