देवउठणी एकादशी, खोपडी एकादशी पारंपारिक पद्धतीने साजरी
प्रतिनिधी | भडगाव - आज दिनांक 23 रोजी रात्री आठ वाजता जय बजरंग मित्र मंडळ भोईवाडा चा राजा मंडळाच्या वतीने कार्तिक शुक्ल एकादशी तिथी निमित्त देवउठणी एकादशी, खोपडी एकादशी पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल एकादशी तिथीला देव उठणे एकादशी साजरी केल्या जाते. याला श्रीहरी प्रबोधनी एकादशी आणि देव उठणी एकादशी असे म्हटले जाते . अशी मान्यता आहे की आजच्या दिवशी भगवान श्रीविष्णू योगनिद्रेतून उठून बाहेर आले व या एकादशी पासून चातुर्मासही संपुष्टात येते.
हिंदू धर्माप्रमाणे दिवाळीनंतर कार्तिक शुक्ल एकादशीला विशेष महत्त्व आहे . यानंतर विवाह व आदी शुभकार्यांची सुरुवात केली जाते . आज भडगाव शहरामध्ये विविध ठिकाणी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला . येथील जय बजरंग मित्र मंडळ भोईवाडा चा राजा मंडळाच्या वतीने यशवंतनगर गणपती मंडळाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने पूजाविधी करून हा उत्सव साजरा करण्यात आला . यावेळी परिसरातील अनेक महिला युवक युवती पुरुष , ज्येष्ठ नागरिक या या उत्सवात सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या