Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जळगाव केमिस्ट भुषण चषक स्पर्धेचे विजेतेपद भडगाव तालुका केमिस्ट असोसिएशन क्रिकेट संघाने पटकावले.

जळगाव  केमिस्ट भुषण चषक स्पर्धेचे विजेतेपद भडगाव तालुका केमिस्ट असोसिएशन क्रिकेट संघाने पटकावले.
प्रतिनिधी | भडगांव:- जळगाव  केमिस्ट भुषण चषक स्पर्धेचे विजेतेपद भडगाव तालुका केमिस्ट असोसिएशन क्रिकेट संघाने पटकावले असून या निमित्ताने केमिस्ट असोसिएशन क्रिकेट संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
       जळगाव केमिस्ट असोसिएशन च्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. हि क्रिकेट स्पर्धा, जिल्हातील केमिस्ट बांधवासाठी खास आकर्षण व मानाची असते. ह्या वर्षी केमिस्ट भुषण चषक क्रिकेट स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. यावर्षी या स्पर्धेचे विजेतेपद भडगाव तालुका केमिस्ट असोसिएशन क्रिकेट संघाने पटकावले. द्वितीय पारितोषिक भुसावळ संघा ने पटकावले. हे विजेतेपद कोरोना काळात रुग्णांची अहोरात्र सेवा बजावत असताना जीव गमावलेल्या केमिस्ट बांधवांना समर्पित करण्याचा निर्णय भडगाव तालुका केमिस्ट असोसिएशन क्रिकेट संघाचे कर्णधार जगदीश सोनवणे, उपकर्णधार किरण पाटिल, व संघातील सर्व खेळाडूनी घेतला. विजेता भडगाव संघास तालुकाध्यक्ष सुरेश भंडारी, सचिव संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, व संघाचे प्रायोजक एच.बी फार्माचे हर्षल चौधरी यांचे सहकार्य लाभले. विजेता भडगाव तालुका केमिस्ट क्रिकेट संघावर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या