Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

एकाच परीवारातील 12 डॉक्टरांकडुन जन्मभूमीत रूग्णसेवा "डॉ. अशोक ओस्तवाल यांनी परिवाराच्या वतीने तितुर गावाला आजीवन मोफत आरोग्य सेवा देण्याचे जाहीर " भडगाव


एकाच परीवारातील 12 डॉक्टरांकडुन जन्मभूमीत रूग्णसेवा 
"डॉ. अशोक ओस्तवाल यांनी परिवाराच्या वतीने तितुर गावाला आजीवन मोफत आरोग्य सेवा देण्याचे जाहीर "

भडगाव

          पाचोरा तालुक्यातील
तितूर येथील स्व . सोभागचंद जी ओस्तवाल यांच्या 27 व्या स्मृतीदिना निमित्त एकाच परीवारातील मात्र वेगवेगळ्या
ठिकाणी असलेल्या 12 डॉक्टरांनी आपल्या मुळगावी नुकतेच मोफत आरोग्य तपासणी व भोजनासह औषध वाटप शिबीराचे आयोजन  केले होते.  शिबिरात एकुण 450 रूग्णांची तपासणी करण्यात आली. जन्मभूमीत पार पडलेल्या शिबीरात कृतज्ञता व्यक्त केली . 
येथील ओस्तवाल परीवारातील एकुण 12 जण मुंबई,  अमळनेर,  नासिक, औरंगाबाद येथे व्यवसाया निमित्त स्थित आहे.  दर वर्षी स्व सोभागचंद ओस्तवाल यांच्या स्मृती निमित्त भडगाव येथील डॉ.  अशोक ओस्तवाल मोठे शिबीराचे आयोजन करतात.  यंदा शिबीराचे 27 वर्ष हे तितूर ता पाचोरा येथे जन्मभूमीत सर्वांनी एकत्र येऊन रूग्णसेवा  करण्याचा मानस आखण्यात येऊन भोजना सह शिबीर संपन्न झाले . डॉ . पारसमल ओस्तवाल , डॉ मोतीलाल ओस्तवाल,  डॉ. प्रकाश ओस्तवाल,  डॉ. चेतन ओस्तवाल , डॉ. मनोज ओस्तवाल,  डॉ. अशोक ओस्तवाल,  डॉ. प्रितेश ओस्तवाल,  डॉ. प्रमोद ओस्तवाल,  डॉ. प्रेमचंद ओस्तवाल,  डॉ. विजय सुराणा , डॉ. आरती सुराणा , डॉ. सुमतीलाल जैन  यांनी शिबिरात उपस्थित राहुन आरोग्य तपासणी केली.  यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रा . कवरलाल ओस्तवाल, डॉ. पारस ओस्तवाल,  सौ सरोज ओस्तवाल कु . प्रिया ओस्तवाल , जैन युवा मंच चे राजेश कुमेरिया , तितुर गावचे सरपंच सुनिल माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिबीराचे आयोजक डॉ. अशोक ओस्तवाल यांनी परिवाराच्या वतीने तितुर गावाला आजीवन मोफत आरोग्य सेवा देण्याचे जाहीर केले. सूत्रसंचलन व आभार रोकडे सर यांनी केले.  साई मेडिकल चे राहूल ओस्तवाल या सह अन्य स्वयंसेवकानी औषध वाटपासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या