दोन गट वगळता सर्वात मोठी लढत हि गुढे-वडजी गटात
भडगाव प्रतिनिधी
भडगाव तालुक्यात ३ गट आहेत त्यातील गिरड-आमडदे व कजगाव-वाडे हे दोन गट आरक्षित झाल्याने केवळ गुढे वडजी गट महिला राखीव झाल्याने , अन्य दोन गट वगळता सर्वात मोठी लढत हि गुढे-वडजी गटात राहणार आहे . येथून गटात मातब्बर उमेदवारांच्या परिवारातील सदस्य रिंगांनात राहणार असल्याने व वडजी गण - हा नागरिकांचा मागास प्रवर्ग व गुढे गण- सर्वसाधारन महिला निघाल्याने येथून मोठी चुरस जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकी साठी पाहावयास मिळणार आहे .
या गटाची मतदार संख्या ३८ हजार २२९ इतकी आहे .
येत्या काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आदर्श आचार संहिता जाहीर होणार आहे . त्यामुळे शिवसेना , राष्ट्रवादी , भाजपा , कौंग्रेस , आरपीआय आदी पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत . इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून मतदार संघात भेटीगाठी सह पार्टीनेत्यांच्या मागे फिरतांना दिसत आहेत . या गटात राष्ट्रवादी कडे मातब्बर इच्छुकांची संख्या जास्त असल्याने त्याच्य फायदा येन वेळी इतर पक्षांना आयता होणार आहे . आगामी काळात मोठ्या घडामोडी येथे होऊ शकता . काही पक्षांना घराचा आहेर देत बंडखोरी होऊ शकते . त्यामुळे आज उमेदवार नसलेले पक्ष हि येन वेळी किंग मेकर ठरू शकतात . पंचायत समिती व जिल्हा परिषद च्या घडामोडी सुरु झाल्या असून मोठी चुरस आगामी काळात पाहावयाला मिळणार आहे .
यागटातून सद्या विकास पंडित पाटील हे राष्ट्रवादी कडून विद्यमान सदस्य आहेत . या गटाचे आरक्षण यंदा सर्वसाधारण महिला निघाले आहे . त्यामुळे विकास पाटील यांना हि निवडणूक लढवता येणार नाही , त्या ऐवजी परिवारातील महिला सदस्य निवडणूक रिंगणात राहू शकते . पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या कार्यकर्त्यांनाच राष्ट्रवादी पक्षाने तिकीट देण्याची मागणी मागे भडगाव झालेल्या मेळाव्यात करण्यात आली आहे .
या गटातून गुड्याचे कै पुंडलिक कळू पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भय्यासाहेंबी पाटील हे राष्ट्रवादी कडून इच्छुक आहेत . तर येथील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास पाटील यांनी राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख संजय पाटील यांचे नाव पक्षाला उमेदवारी साठी सुचवले आहे . त्यांच्या साठी विकास पाटील हे उमेदवारी करणार नसल्याचे यांचे त्यांचे म्हणणे आहे .
इच्छुक - गुढे - वडजी गट - ( ओबीसी महिला )
राष्ट्रवादी कडून - भय्यासाहेब पाटील, संजय पाटील , माजी पंचायत समिती सभापती लक्ष्मीबाई पाटील , विकास पाटील , शिवसेना पक्षा कडून - राजेंद्र देविदास पाटील गुढे , मच्छिन्द्र पाटील ,पंधरद , शिंदीचे डॉ . विलास पाटील , भाजपा कडून - भास्कर पाटील , उत्तम महाजन , दादा भिला पाटील , पिचरड्याच्या मंगलबाई भिकन पाटील (स्वता) तर वरील सर्वांच्या घरातील महिला उमेदवार निवडणुकी साठी इच्छुक आहेत .
वडजी गण - हा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून निघाल्याने - राष्ट्रवादी - विनोद बोरसे , विजय संभाजी महाजन पिचर्डे , वडजी येथून एक , राजेंद्र भीमराव पाटील पंधरद , तर सेनेनकडून आर टी पाटील, वडजी , आधार दगा पाटील , लहान खेडगाव , डॉ विलास पाटील, शिंदी , अनिल पाटील शिंदी , भाजप कडून - पुरुषोत्तम सोनावणे, शिंदी. सचिन चुडामण पाटील, वडजी . धनराज भिकन पाटील, पिचर्डे , वसंत शिनकर खेडगाव ,
गुढे गण - सर्वसाधारन महिला - राष्ट्रवादी- ओंकार महाजन , कोळगाव , विकास पंडित पाटील यांच्या घट्र्रातील महिला , गुणवान पाटील , लक्ष्मी बाई पाटील माजी सभापती यांच्या घरल महिला , काशिनाथ महाजन , शिवसेना - साहेबराव महाजन कोळगाव , संजय हंसराज पाटील गुढे , तर भाजप - प्रतिभा योगेंद्र पाटील आडळसे , विजय महाजन, गुढे . भगवान पाटील जुवर्दी, दगडू महाजन कोळगाव ,
गुढे-वडजी गटात एकूण- गुढे,कोळगाव , पथराड, जुवार्डी , आडळसे , पिंप्रीहाट , बात्सर ,वडजी , पंधरद, पिचर्डे, शिंदी, खेडगाव खु, , वडगाव नालबंदी, पेडगाव गावांचा समावेश असून या भागातील विकासाचा मुद्दा हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे . विकास कामे कमी केल्याचा आरोप जनतेचा आहे . तर विकास कामांच्या जोरावरच पुन्हा एकदा या गटातून उमेदवार विजयी होणार असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे . मात्र विकास कामांच्या आश्वासनांनी लोकांना अद्याप प्रतीक्षेत ठेवले असल्याने या निवडणुकीत मोट्या प्रमाणात हा कळीचा मुद्दा ठरू शकतो .
0 टिप्पण्या