Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

कनिष्ठ महाविध्यालय शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी तहसीलवर धरणे आंदोलन

कनिष्ठ महाविध्यालय शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी तहसीलवर धरणे आंदोलन

भडगाव।

  कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्य़ातील सर्व तहसील कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले . भडगाव तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आज विविध मागण्यांसाठी  भडगाव तहसील कार्यालयासमोर दुपारी 1 वाजता धरणे आंदोलन केले , यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री मुकेश हिवाळे यांनी  निवेदन स्वीकारले. निवेदनातुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, अनुदानास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरित वेतन देण्यात यावे, शिक्षकांच्या व संस्थेच्या प्रलंबित माण्यता त्वरित  देण्यात याव्यात, यासह अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या . 

> याप्रसंगी ज्युक्टो चे भडगाव तालुका अध्यक्ष श्री डि.डि.भोसले, शरद पाटील, सचिव एल के वाणी, संदीप सोनवणे सर, एस व्हि शिंदे, एम पी पवार, यु वाय पाटील, आर ए पाटील, हेमंत भोसले , भागवत पाटील सर, प्रशांत पाटील, महेंद्र महाजन, कसोदे मॅडम , एस एल मोरे, मीनल पाटील , छाया पाटील, विजय केदार, पी एन तायडे, श्रीमती एस एल रॉय , श्रीमती एम एन वेलीस्कर , श्रीमती एस व्ही मोरे , ए पी जावळे, यांच्यासह सौ सु गि पाटील विद्यालय, लाडकुबाई क महाविध्यालय, आदर्श कन्या विद्यालय, भडगाव. जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गिरड, गो पु पाटील विद्यालय, कोळगाव, यासह विविध क महाविद्यालयांचे शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी शिक्षकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या