भडगाव एमआय डीसी साठी 2 ऑगस्ट ला विधानभवन दालनात उधोग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
भडगाव :-
भडगाव एमआय डीसी साठी दि 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता विधानभवन दालनात उधोग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे . यात भडगाव शहरालगत निंभोरा शिवारातील जमिनीवर व पाचोर्यातालुक्यात पिंपळगाव हरे, येथे औद्योगिक वसाहतीस मंजूरी मिळणे बाबत व चोपडा औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात बाबतच्या विषयावर महत्त्वाची चर्चा होणार आहे .
आमदार किशोर पाटील व आ चंद्रकांत सोनवणे यांना बैठकीस हजार राहण्याचे पत्र मिळालं असुन भडगाव येथील बहू प्रतिक्षित व रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला औद्योगिक वसाहतिचा प्रश्न मार्गी लागण्या कामी यात चर्चा होणार असल्याने भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुण व व्यापाऱ्याच्या आशा पल्लीत झाल्या आहेत .
याच एमआयडीसी जागे जवळ भडगाव येथील बहू चर्चित व प्रलंबित 132 केव्ही सबस्टेशन चा विषय प्रलंबित आहे त्यावरही लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आज आमदारांच्या उपोषणा नंतर ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे .
0 टिप्पण्या